या पुस्तकातून व्यापक जाणीव-जागरूकतेचा जो जागर केला आहे, तो प्रगल्भ लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या सुजाण नागरिकांना विवेकी, विचारी व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी साहाय्यकारी होणारा आहे
डॉ. अभिजित वैद्य हे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ गेली अनेक वर्षे ‘आरोग्यसेने’मार्फत एक सामाजिक बांधीलकी मानून पूर, भूकंप झालेल्या भागात तातडीनं वैद्यकीय सेवा देत आहेत. विषयाचा सखोल अभ्यास, त्यातली सामाजिक, आर्थिक, राजकीय गुंतागुंत नेमकेपणानं मांडत स्वत:च्या प्रज्ञेनं त्यावर भाष्य करणं, यामुळे या अग्रलेखांना वैद्य तात्विक मूल्यप्रदान करत, तिला वैचारिक निबंधाचे रूप प्राप्त करून देतात.......